रावेरात लोकप्रतिनिधींच्या संतापानंतर अधिकार्यांनी केली पाहणी
रावेर : कोरोना काळात महसूल अधिकारी प्रतिसाद देत नाही. म्हणून शनिवारी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रचंड आगपाखड करताच प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी कोरोना सेंटरची पाहणी केली. उपाय-योजना संदर्भात सूचना केल्या आहे. फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक रावेर दौर्यावर होते. आज कोविड सेंटरच्या पाहणी केली. सोई-सुविधाची माहिती घेतली. कोविड सेंटरच्या बाहेर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्याच्या सूचना तहसीलदार यांना करण्यात आले आहे. काळ अत्यंत वाईट सुरु असून नागरीकांनी देखील काळजी घेण्याचे अवाहन प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी
केले आहे.
बरे होण्याचे प्रमाण 84:40 टक्के तर मृत्युदर 3.1
रावेर तालुक्यात 3 हजार 590 कोरोना बाधित होते. त्यापैकी 530 कोरोना पेशंट एक्टिव आहे.त्यामुळे तालुक्यात बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे.तर कोरोना मुळे आता पर्यंत 119 जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे तालुक्यात मृत्युदर हा 3 टक्के असल्याचे वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी सांगितले.



ड्युरा सिलेंडरसाठी 51 हजाराची मदत
दरम्यान रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने,तेथे मोठ्या ड्युरा सिलेंडरची गरज निर्माण झाली.यासाठी दानशुरांनी पुन्हा सहकार्य करण्याचे अवाहन प्रांतधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. अवाहनाला प्रतिसाद देत आज केळी व्यापारी सुरेश नाईक यांनी 51 हजाराची आर्थिक मदत प्रशासना कडे चेक स्वरूपात केली आहे.
प्रांतधिकार्यांनी
तहसीलमध्ये घेतली बैठक
आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी तालुक्याच्या महत्वाच्या अधिका-यांची बैठक घेऊन कोरोना व्हायरसच्या उपाय-योजने संदर्भात माहिती जाणून घेतली व सूचना केल्या यावेळी बैठकीला तहसीलदार उषाराणी देवगुणे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल,मुख्याधिकारी रविंद्र लांडे वैद्यकिय अधिकारी डॉ एन डी महाजन आदी उपस्थित होते.
