सर्व सुपरफास्ट बसेसला थांबा देण्यात यावा


तर भाजपातर्फे आंदोलनाचा इशारा

वरणगाव : पूर्वी वरणगाववरून जाणार्‍या सर्व सुपर फास्ट बसेस या बस स्थानक चौफुलीवरून जात होत्या. मात्र, आता चालक बस ह्या नवीन बायपास सुरू झाल्यामुळे नवीन बायपासवरून घेऊन जात असल्यामुळे प्रवाश्यांना चार ते पाच किलोमीटरचा मोठा फेरा मारावा लागत आहे. त्रास सहन करावा लागत आहे. सर्व सुपर फास्ट बसेसला वरणगाव शहरात थांबा देण्यात यावा. आज वरणगाव शहर हे नगरपरिषद असलेले शहर आहे. 28 खेडे हे वरणगाव शहराला लागून आहेत. तसेच वरणगाव शहर हे पूर्वी तालुक्याचे गाव होते. भविष्यात सुद्धा वरणगाव हे तालुक्याचे गाव होणारच आहे. सर्व सुपरफास्ट बसेस या बसस्थानक चौफुलीवरूनच सोडण्यात याव्या, सर्व सुपरफास्ट बसेसला वरणगाव शहरात थांबा देण्यात यावा. तसेच बस येण्याचे व जाण्याचे वेळापत्रक बस स्थानक चौफुल्लीवर अधिकृत लावण्यात यावे. तसेच वरणगाव बस स्थानक चौफुलीवर प्रवाश्यांना बसण्यासाठी बेंच टाकण्यात यावे. तसेच बस स्थानक करण्यात यावे, असा बस रोको आंदोलनाचा इशारा विभाग नियंत्रक महाराष्ट्र परिवहन महामंडळ जळगाव यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा शहाराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, अल्पसंख्यक अध्यक्ष डी.के.खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी. जंजाळे, हाजी अल्लउद्दीन सेठ, शामराव धनगर, अजय पाटील, संजय जैन, उपाध्यक्ष हितेश चौधरी, नटराज चौधरी, युसुफ खान, प्रवीण ढवळे, आकाश निमकर, मिलिंद भैसे, पप्पू ठाकरे, डॉ.प्रवीण चंदने, जावेद सेठ, गोलु राणे, ज्ञानेश्वर घाटोळे, गजानन वंजारी, कृष्णा माळी, संदीप माळी यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रति आमदार संजय सावकारे खासदार रक्षाताई खडसे विभाग नियंत्रक जळगाव यांना पाठविल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !