सबवेच्या गर्डरसाठी 1 व 2 ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
खडवली आणि वसिंद दरम्यान होणार काम : काही गाड्या रद्द तर काही उशिराने धावणार
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभाग रोड क्रेन वापरुन खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मर्यादित उंचीचे सबवे (एलएचएस) च्या आरएच गर्डर टाकण्यासाठी एकीकृत रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक संचलित करणार आहे.
1 व 2 मे रोजी रात्री (शनिवार/रविवार मध्यरात्र) ब्लॉकचा कालावधी मध्यरात्री 02.15 वाजेपासून 07.25 वाजेपर्यंत ब्लॉक असून
लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 61 (खडावली व वसिंद दरम्यान) आणि क्रमांक 68 (आसनगाव व आटगाव दरम्यान) येथे आरएच गर्डरच्या उभारण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
या गाड्या होणार प्रभावीत : सहा गाड्या रद्द
टिटवाळा ते आटगाव दरम्यान अप आणि डाऊन लाईनवर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 01141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आदिलाबाद विशेष गाडी 30 एप्रिल रोजी सुटणारी आणि 01142 आदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 1 मे रोजी सुटणारी, 07057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सिकंदराबाद विशेष गाडी 2 मे रोजी सुटणारी आणि 07058 सिकंदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 1 मे रोजी सुटणारी तसेच 07618 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजुर साहेब नांदेड विशेष गाडी 2 मे रोजी सुटणारी आणि 07617 हुजुर साहेब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 1 रोजी सुटणारी.



या गाड्यांचे नियमन
मेल/एक्स्प्रेस गाडीचे वेळापत्रकाचे पुनःनिर्धारण:
02106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 1 रोजी 3 तास (निर्धारित वेळ 14.40 वाजता) पुनःनिर्धारीत करण्यात आली आहे.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन
2 मे रोजी मुंबईकडे येणार्या खालील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित केल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 3 ते 5 तास उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. 01120 लखनौ-लोकमान्य टिळक टर्मिनस हॉलिडे स्पेशल, 01102 मंडुवाडीह-दादर हॉलिडे स्पेशल, 01237 नागपूर-मडगाव विशेष, 01052 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 02618 ह.निजामुद्दीन-एर्नाकुलम विशेष, 02138 फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष
डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन
2 मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्या खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या ब्लॉकच्या कालावधीत नियमित करण्यात येतील. 02129 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष गाडी, 02259 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा विशेष गाडी, 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी, 02136 मडगाव-नागपूर हॉलिडे स्पेशल.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन
मुंबईकडे येणार्या खालील मेल/एक्स्प्रेस विशेष गाड्या जळगाव – सूरत मार्गे वळविण्यात येतील आणि कल्याण परीसरातील प्रवाशांसाठी भिवंडी रोड स्थानकात थांबा देण्यात येईल. 02104 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल (30 एप्रिल रोजी सुटणारी), 02810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (30 एप्रिल रोजी सुटणारी). दरम्यान, ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांचे कामकाज: ब्लॉक कालावधीत टिटवाळा ते कसारा विभागात/दरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध होणार नाहीत.

