हबीबगंज-पुणे हमसफर विशेष एक्स्प्रेस रद्द
भुसावळ : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे विशेष गाड्यांचे रद्दीकरण करण्यात आले आहे. 02152 हबीबगंज-पुणे हमसफर विशेष गाडी 1 मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आणि 02151 पुणे-हबीबगंज हमसफर विशेष गाडी 2 मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात येतील. खडावली आणि अटगांव दरम्यान दोन सबवेसाठी आरएच गर्डर्स लाँचिंगसाठी एकीकृत नाइट ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक असल्यामुळे जबलपूर-कोयंबतूर विशेष रद्द राहिल. 02198 जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी 1 मे रोजी सुटणारी रद्द आणि 02197 कोयंबतूर-जबलपूर विशेष गाडी 3 मे रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.




