मुंबई-नागपूर-हावडा दरम्यान आणखी एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या
भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 3 पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद (वन वे)
01460 विशेष गाडी नागपूर येथून 3 मार्च 11.30 वाजता सुटल्यांनतर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी 2.15 वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, दादर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा विशेष अतिजलद (वन वे)
01325 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 4 मे रोजी 5.15 वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्या दिवशी 8.15 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, भुसावळ, नागपूर, रायपूर, बिलासपूर, टाटानगर स्थानकावर थांबा दण्यात आला आहे.
पुणे-दानापूर विशेष गाडी
01477 सुपरफास्ट विशेष गाडी 3 रोजी पुणे येथून 9.30 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी 4.40 वाजता पोहोचेल. 01478 विशेष गाडी 5 रोजी दानापूर येथून सकाळी सात वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी 4.20 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी जं., पं. दीन दयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

