26 गुन्ह्यातील कुविख्यात भूषण बोंडारे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


उमाळ्याजवळ आरोपीने साथीदारांच्या मदतीने पिस्तुलाच्या धाकावर केली लूट

जळगाव : तब्बल 26 गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात आरोपीच्या गुन्हे शाखेने औरंगाबादमधून अटक केली आहे. भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे (रा.उमाळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी बोंडारेने आपल्या चार साथीदारांसह उमाळ्या रस्त्यावर एका कार चालकाला पिस्तुलाच्या धाकावर लुटल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी औरंगाबाद येथे पसार झाला होता.

एमआयडीसी पोलिसात दाखल होताा गुन्हा
काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद जळगाव-महामार्गावर एका कारचालकाला लुटून फरार झालेल्या टोळीतील आरोपी बोंडारे याच्या बुधवारी जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मुसक्या आवळल्या. आरोपीविरोधात एमआयडीसी पो.स्टे.गुरनं. 1050/2020 भादंवि क 394, 34 गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज शिंदे, अविनाश देवरे, पोकॉ दिपक शिंदे आदींनी ही कारवाई केली.







पिस्तुलाच्या धाकावर केली होती लूट
सहा महिन्यांपूर्वी आरोपी बोंडारेने उमाळ्याचाच अजय सुदाम भिल, औरंगाबादचे बंटी ऊर्फ प्रथमेश पाटील, पवन अग्रवाल व मनोज भांबर्डे (रा.वाळुज) यांनी एका कारमध्ये बसून उमाळाकडे येतांना पिस्तोल कारवाल्यास लावली होती त्यावेळी मनोज भांबर्डे याने त्याच्या डोळयात मिरची पावडर फेकून त्याचेजवळील रोख रुपये व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. चोरलेल्या पैशांचे सर्वांना वाटप केले मात्र संशयीतांचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने आरोपी बाहेर गावी औरंगाबादला निघून गेलाा. आता मी उस्मानपुरा औरंगाबाद येथे मित्राच्या खोलीत राहत आहे, अशी कबुली त्याने या पथकाला दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !