p>

विद्यार्थी आरोग्य तपासणीसह विविध सामाजिक उपक्रम राबवणार


श्रीनिवास नारखेडे : के.नारखेडे विद्यालयाचे सुवर्ण जयंती वर्ष

भुसावळ : के.नारखेडे विद्यालयाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त शाळेत शिकलेल्या व माजी विद्यार्थी व आता डॉक्टर असलेल्या विद्यार्थ्यांकडून आरोग्य तपासणी शिबिरासह विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत संस्थाध्यक्ष श्रीनिवास नारखेडे यांनी दिली. तु.स. झोपे विद्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परीषद झाली. 14 व 15 रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रोपट्याचा झाला वटवृक्ष
नारखेडे म्हणाले की, 1968 मध्ये लहानसे रोपटे लावण्यात आले होते. त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेचे सुवर्ण जयंती वर्ष असून या संस्थेतून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत. या पार्श्वभुमीवर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येईल. 14 डिसेंबरला हनुमान नगरातील शाळेपासून निघालेली शोभायात्रा के. नारखेडे शाळेत आणली जाईल शिवाय याचदिवशी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 15 शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा होईल. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन पी.व्ही.पाटील, डॉ.संजीव नारखेडे, जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संचालक विकास पाचपांडे, मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, एस.एन.चिपळूणकर उपस्थित होते. शिक्षक मनोज कुळकर्णी यांनी प्रस्तावना केली. एस.एन. चिपळूणकर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. आभार मुख्याध्यापक किरंगे यांनी मानले.


कॉपी करू नका.