जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 999 रुग्ण आढळले
24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 2272 रुण्गांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 999 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 18 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 1037 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2272 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 1037 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 26 हजार 453 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 14 हजार 469 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



