शहीद कोरोना योद्ध्यांचे विमा कवच प्रस्ताव मंजुरीसाठी खंडपीठात जनहित याचिका
भुसावळ : केंद्र (प्रधानमंत्री जनआरोग्य कल्याण अंतर्गत) आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व प्रमाणित कोरोना योेद्ध्यांसाठी, कोरोना कार्यकाळात कोरोना रुग्णांची सेवा करत असतांना कोरोना संक्रमित होवून उपचाराअंती मयत झाल्यास त्यांच्या वारसांना 50 लाख देण्याचे जाहीर केले होते आणि आता या योजनेला 28 एप्रिल 2021 च्या पत्रानुसार पुढील 180 दिवस मुदतवाढ देण्यात आली असलीतरी जे कोरोना योद्धा गेल्या पहिल्या लाटेमध्ये आपले कर्तव्य बजावतांना मयत झाले त्यांचे अजूनही एक वर्ष होत आले तरी प्रस्ताव मंजूर झाले पाहीत. याकामी दि न्यू इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीने प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमल्यास फायलींमधील अडथळे दूर होवून प्रकरण मार्गी लागेल म्हणून जनहित याचिका दाखल करावी, डॉ.नि.तु.पाटील यांनपी केली आहे.
तीन कर्मचार्यांना अद्यापही नाही मदत
भुसावळ पालिका स्वच्छता कर्मचारी कै.प्रकाश करणसिंग तुरकुले यांचा 12 जुन 2020 मृत्यू झाला तसेच वरणगाव नगरपरीषद कर्मचारी कै.सुरेश केशव शेळके यांचा 8 ऑगष्ट 2020 रोजी मृत्यू झाला तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कै.चंद्रभान काशीराम भोई यांचा द.11 जून 2020 रोजी मृत्यू ओढवूनही त्यांच्या वारसांना अद्याप मदत मिळालेली नाही.



या मागण्यांसाठी जनहित याचिका
कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर इन्शुनन्स मिळण्यासाठी प्रस्ताव त्यांच्या कार्य ठिकाणावरून जळगाव मग नाशिक तर काहींचा मुंबई नंतर पुणे/नागपूर येथील दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे सेटल होण्यासाठी जातो मात्र काही कागदपत्रे कमी राहिल्यास परत फायतीचा उलट दिशेने प्रवास सुरू होतो मुळात ही प्रक्रिया वेळ खावू आहे शिवाय या प्रक्रियेत शासकीय दिरंगाई दिसून येते. त्यामुळे कुठेतरी शासनाला मयत कोरोना योध्या व परीवार याविषयी असंवेदना दिसून येत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. विमा कवच देणार्या दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीने प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमल्यास संबंधिताना कागदपत्रांची पूर्तता करताना अडचण येणार नाही शिवाय कोरोना योद्ध्यांच्या परीवाराची त्यामुळे ससेहोलपट देखील थांबेल, असेही डॉ.नि.तु.पाटील यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.
प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा,
डॉ.पाटील यांनी न्याय मागणीसाठी ऑनलाईन जनहित याचिका ई-मेल मुंबई/औरंगाबाद खंडपीठात पाठवली असून कागदपत्रे स्पीडपोस्टाने पाठवणार असून ही मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्रामधील तमाम करोना योद्धा यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर होतील आणि त्यामुळे परीवाराला आर्थिक दिलासा मिळेल शिवाय कार्यरत कारोना योध्याचं मनोबल वाढेल, असेही डॉ.नितु पाटील कळवतात.

