आधी मैत्री नंतर प्रेम व केला अत्याचार : तरुणाविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : नातेवाईकांच्या लग्नात झालेली भेटीनंतर झालेली मैत्री व नंतर प्रेम बहरले व काही दिवसानंतर लग्नाचे आमिष देवून तरुणाने तरुणीवर अत्याचार केला मात्र लग्न न करता दुसर्या तरुणीशी विवाह केल्याने फसवणूक झाल्याचे कळताच तरुणीने तक्रार दिल्याने पुण्याच्या तरुणाविरुध्द सिटीचौक पोलिसानी मंगळवारी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. आकाश कोंडीराम जाधव (30,रा.खराडी,पुणे, मूळ रा. इंदापुर सांवगी, ता. खुलताबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लग्नाच्या आमिषाने अत्याचाराचा आरोप
खाजगी नोकरदार असलेल्या पीडीतेशी एका लग्नात आरोपीची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री होवून पे्रम निर्माण झाले. लग्नाचे आमिष देत आरोपीने प्रेयसीला औरंगाबाद शहरातील लॉजवर तसेच पुणे, महाबळेश्वर येथे नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने लग्नाचे वचन तोडून त्याने मार्च महिन्यात दुसर्याच मुलीसोबत लग्न केल्याने ही बाब पिडितेला खटकली. यानंतर पिडितेने काल सिटीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.





