भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वरणगाव राष्ट्रवादीतर्फे निषेध
वरणगाव : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्याविषयी काढलेल्या वक्तव्याचा वरणगावातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी निषेध केला. मंत्री छगनराव भुजबळ यांनी पश्चिम बंगाल येथील लागलेल्या निवडणूक निकालाबद्दल ममता बॅनर्जी या ‘झाशीच्या राणीसारख्या लडल्या’ आणि निवडणुकीत यश मिळवले, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगनराव भुजबळ यांना अतिशय उद्धट भाषेत धमकी देऊन ‘भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहेत विसरू नका, तुम्हाला आम्ही पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. मंत्र्यांनाच असे धमकावले जात असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
निवेदन देताना होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू भाई जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, उपशहराध्यक्ष कैलास माळी, शेख रीजवान, माजी नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक बबलू माळी, महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, पप्पू माळी, ओबीसी वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे, दयावान शिंपी, रवींद्र पाटील, शांताराम सुरळकर, भीमराव गव्हाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


