वरणगाव ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 वयोगटासाठी कोवॅक्सीन लसीकरण केंद्र सुरू करा
आमदार संजय सावकारे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भुसावळ : वरणगाव ग्रामीण रुग्णालयात 8 ते 44 वयोगटातील नागरीकांसाठी कोवॅक्सीन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, वरणगाव शहराची लोकसंख्या सुमारे 35 हजारांच्या जवळपास असून वरणगाव परीसरातील गावांची संख्या सुमारे 20 ते 25 असून या परीसरात 18 ते 44 वयोगटासाठी कोवॅक्सीन लसीकरण उपलब्ध नाही. भुसावळ तालुक्यात केवळ किन्ही व यावल रोड भुसावळ येथील पीएचसी मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वरणगाव परीसरात नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात तातडीने 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करावे, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आमदारांनी केलेल्या दूरध्वनीवरील सूचनांच्या अनुषांगाने तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनाही कोवॅक्सीन केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

