गारखेड्यात घराला आग लागल्याने दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
जामनेर : तालुक्यातील गारखेडा येथे घराला आग लागून दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. उत्तम श्रावण चौधरी (47) व वैशाली उत्तम चौधरी (44) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले असतांना रात्री दोन वाजेच्या सुमारास घराला आग लागली. भुसावळ जामनेर रस्त्यावरुन जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर निघताना दिसल्यानंतर त्या ट्रक चालकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडला असता भीषण घटना समोर आली. दाम्पत्याच्या पश्चात विवाहीत मुलगी व मुलगा असा परीवार आहे.





