पाणी भरण्याचा वाद विकोपाला : मारहाणीत एकाचा मृत्यू
मूर्तिजापूर : सार्वजनिक बोअरवेलवेल पाणी भरण्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर उद्भवलेल्या वादानंतर चौघांवर झालेल्या हल्यानंतर एकाचा अत्यवस्थ अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. तालुक्यातील शेलू बोंडे येथील पारधी बेड्यावर पाणी भरण्याच्या वादातू ही घटना 11 मे रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. संतोष पवार असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसींग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार (रा. पारधीबेडा शेलू बोंडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींच्या हल्ल्यात शेरसिंग ग्यानू पवार, मितवा पवार, सागर पवार हे गंभीर जखमी झाले.