शेती नावावर न केल्याने आईला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न


रावेर तालुक्यातील मोरगाव गावातील संतापजनक घटना

रावेर : शेत जमीन नावावर करून न दिल्याने एका कुपुत्राने स्वत:च्याच आईला जिवंत पेटून दिल्याची घटना रावेर तालुक्यातील मोरगांव येथे घडली. या घटनेत आई गंभीर भाजली असून तिच्यावर रावेर ग्रामीण रग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत सुगंधा पांडुरंग पाटील (70) या वृद्धा भाजल्या असून आरोपी कुपूत्र नवल पाटील (42) याच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !