पत्नीचा खून : आरोपी पतीला जन्मठेप


जळगाव : मुलीच होत असल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालत तिच्या डोक्यात लाकडी दांडा मारून तिचा खून करणार्‍या आरोपीला पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पप्पू रतन पवार (31, रा.विवेकानंद नगर तांडा, ता. पाचोरा, जि.जळगाव) असे आरोपीचे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे.

मुलीची साक्ष ठरली महत्वपूर्ण
पाचोरा तालुक्यातील विवेकानंद तांडा येथे आरोपी पप्पू पवारने पत्नी कस्तुरबाई पवार (30) हिच्याशी 9 जुन 2019 रोजी दारूच्या नशेत भांडण करून तिच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी होवून मरण पावली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली,.कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगितला. सोबत फिर्यादी पद्मबाई राठोड, डॉ.निलेश देवराज पंच साक्षीदार, उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या झाल्यात. साक्षीदार व पुराव्याच्या आधारावर न्या. जगमालानी यांनी पप्पु पवार याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पती पप्पू पवार हा कारागृहातच होता. बुधवारी न्यायालयाने सदरची शिक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुनावणी घेऊन ठोठावली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !