पोलिसांच्या गोळीबारात 13 नक्षलवादी ठार


गडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 या पथकाला शुक्रवारी कारवाईदरम्यान मोठे यश आले असून नक्षलवाद्यांचे अभियान सुरू तेथे पोलिसांची तुकडी पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केल्याने या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे. खबर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली. याच अभियानादरम्यान शुक्रवारी सकाळपासूनच पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !