सिमेंट गट्टूने ठेचून एकाचा खून


औरंगाबाद : डोक्यावर जड सिमेंट गट्टूने मारहाण करीत 40 वर्षीय अनोळखी इसमाचा खून करण्यात आल्याची घटना नवा मोंढा परीसरात जाधववाडीतील भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सिडको ठाण्यात अज्ञातांविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. नवा मोंढा जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर शुक्रवारी सकाळी 7.45 वाजेच्या अनोळखीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. सुरक्षारक्षक कंपनीचे कार्यालय तेथेच असल्यामुळे सुपरवायझर दिलीप सुरेश बोर्डे यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिस उपायुक्त दीपक गिर्‍हे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक निरीक्षक सुनील अरबाड, फौजदार बाळासाहेब आहेर आणि गुन्हेशाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गांजाच्या गोळ्या, पाण्याची बाटली तेथे आढळून आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !