सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळावी
सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी
भुसावळ : सीबीएसई शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळावी, अशी मागणी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. उच्च प्रतीचे, चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी पालक वर्ग आर्थिक परीस्थिती नसतानाही अव्वाच्या-सव्वा शैक्षणिक शुल्क असलेल्या सीबीएसई शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेता मात्र शाळांमध्ये दरवर्षी शैक्षणिक शुल्क नेहमीच वाढवून मनमानी कारभार केला जातो शिवाय या बाबीवर कुणाचचाही अंकुश राहत नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला.
स्कॉलरशीप योजना सुरू कराव्यात
शिशिर जावळे यांच्या निवेदनाचा आशय असा की, कोरोनामुळे शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षण सुरू होते शिवाय ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाल्या नाहीत वर्गही भरले नाहीत. सोबतच शाळेतील कोणत्याही साहित्याचा वापर विद्यार्थ्यांकडून झाला नाही. तरीही शाळांकडून ज्या-ज्या सुविधा (ग्रंथालय, पार्किंग, गणवेश, दप्तरं, प्रयोग शाळा, संगणक प्रयोगशाळा, बिल्डिंग मेन्टेनन्स शुल्क सांस्कृतिक फीज वगैरे) विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत ते विविध शुल्क सुद्धा शाळा पालकांकडून वसुल करीत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व शाळांना 15 टक्के शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतरही काही शाळा ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत त्याचेही पैसे उकळत आहेत त्यामुळे कोरोनामुळे आर्थिक परीस्थिती खालावल्याने सर्वच पालकांचे कंबरडे मोडले आहे. हा आर्थिक ताण कमी होण्यासाठी सीबीएसई माध्यमाच्या विनाअनुदानीत-अनुदानीत सर्वच शाळांमध्ये सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक, परीक्षा शुल्कात सवलती मिळाव्यात व यासाठी विविध स्कॉलरशीप योजना सूरू कराव्यात,. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.



