विधानपरीषद सदस्य नियुक्तीबाबत निर्णय कधी ? : उच्च न्यायालयाची राज्यपाल सचिवांना विचारणा
मुंबई : राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 विधानपरीषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत केव्हा निर्णय घेणार ? अशी विचारणा शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांकडे केली आहे. या संदर्भात आता काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिफारस केलेल्या नावांमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाची शिफारस असल्याने या निर्णयाकडे खडसे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

