पोलिस निरीक्षकाला 25 हजारांची लाच देणारे तिघे जुगारी जाळ्यात


दहिहंडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी एसीबीकडे नोंदवली होती तक्रार

अकोला : एरव्ही एखाद्याच्या कामाच्या बदल्यात अधिकार्‍यांकडून पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदार त्यांच्याविरुद्ध एसीबीचा ट्रॅप आणतात मात्र अकोला जिल्ह्यात पोलिस निरीक्षकाने जुगार्‍यांनी दिलेले प्रलोभन नाकारत थेट एसीबीकडे तक्रार नोंदवली व 25 हजारांची लाच जुगार्‍यांनी देताच त्यांना सापळा रचून असलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. शिवा गोपाळराव मगर (30, रा. अकोट, ता.अकोट, जि.अकोला, अभिजीत रवीकांत पागुत (31, रा.अकोट, ता.अकोट, जि.अकोला), घनशाम गजानन कडू (रा.लोतखेड, ता.अकोट, जि.अकोला) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी लाचेचे आमिष
दहिहंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू, वरली मटका आदी अवैध धंदे सुरू करण्यासाठी तक्रारदार लोकसेवक यांना 50 हजार रुपये प्रलोभन देण्यात आले व तडजोडीअंती 25 हजार रुपये लाच प्रलोभन म्हणून लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी आरोपी अभिजीत पागुत व घनशाम कडू यांनी प्रोत्साहन दिले तसेच लाच रक्कम ठरल्याप्रमाणे आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी तक्रारदार लोकसेवक यांना देताच रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, 20 व 21 मे रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली.







यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे अमरावती पोलिस अधीक्षक विशाल वि.गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शरद मेमाणे, पोलिस हवालदार अन्वर खान, पोलिस नाईक संतोष दहिहाडे, सुनील येलोने आदींच्या पथकाने यशस्वी केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !