बापरे ! एकाच वेळी घरात निघाले 98 साप
वर्धा : बाथरूमचे बांधकाम सुरू असताना ड्रम हलवल्यानंतर त्याखाली चक्क 98 साप निघाल्याने कामगारांसह घर मालकाची भंबेरी उडाली मात्र सर्पमित्रांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी सर्पांना पकडत त्यांना जंगलात सोडले. दिवड जातीचे व बिनविषारी सर्प असल्याचे सांगण्यात आले. पांडुरंग वार्ड अगस्थी मार्ग येथील मनोज कुडमेथे यांच्या घरात हे सर्प आढळले तर गरूडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्राणी मित्र गौतम पोहाणे व प्राणीमित्र मनीष ठाकरे, तुषार साबळे, अनिल माहोरे, संतोष पडोळे, संकेत मनोरे, रोशन सुरजुसे, दुर्गेश वानखडे यांनी 98 सापांना पकडत आर्वी वनविभागात नोंदणी करून त्यांना लहादेवी जलाशय वनपरीक्षेत्रात सोडून जीवनदान दिले.





