पोलिसांच्या बदली प्रक्रियेत ‘जीटीपीएमएस अॅप’ पारदर्शकता आणणार
पुणे : पोलिस दलात होणार्या बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे मात्र पुणे शहर पोलिस दलातील बदली प्रक्रियेत आता अधिक पारदर्शकता येण्यासाठी सर्वसाधारण बदली पोलिस व्यवस्थापन प्रणाली (जीटीपीएमएस) या अॅपचा वापर होईल. या प्रणालीत प्रत्येक कर्मचार्याची पदनिहाय व कामानिहाय नोंद तर होईलच शिवाय परीमंडळातील कोणत्या पोलिस ठाण्यात सहायक फौजदार, हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांची संख्या किती आहे, हे देखील बदलीवेळी कळेल. स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. त्यानुसार अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या पथकाने एका कंपनीमार्फत हे अॅप विकसीत केले.