14 हजारांची लाच भोवली : स्थापत्य अभियंता एसीबीच्या जाळ्यात


यवतमाळ : पुसद नगरपरीषदेतील बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता अश्विन रामेश्वर चव्हाण (31) यास 14 हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने अटक करताच नगरपरीषद वर्तुळात खळबळ उडाली. मंगळवारी हा सापळा यशस्वी करण्यात आला. शहरात केलेल्या नाली बांधकामाचे देयक काढण्यासाठी नगरपरीषदेतील स्थापत्य अभियंत्याने 14 हजाराची मागणी करताच कंत्राटदाराने तक्रार नोंदवली. नगरपरिषदेतील प्रसाधनगृहाजवळ अभियंता अश्विन चव्हाणने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आर.बी. मुळे, जमादार सुरेंद्र जगदाळे, नीलेश पखाले, अनिल राजकुमार, विजय अजमिरे, राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सुधाकर कोकेवार यांनी केली.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !