शेतात ट्रॅक्टर उलटले : तरुण चालकाचा जागीच मृत्यू


जळगाव : शेतात ट्रिलरचे काम करीत असताना ट्रॅक्टर उलटल्याने त्या खाली दबले जावून रामदेव वाडीतील तरुण चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कैलास तुकाराम राठोड (20) असे मयत चालकाचे नाव आहे.

ट्रिलर काम करताना उलटले ट्रॅक्टर
आयटीआयमध्ये शिक्षण घेणारा कैलास राठोड हा वावडदा शिवारामधील स्वत:च्या शेतात आई मुन्नाबाई, वडील तुकाराम गंगाराम राठोड व मोठे काका सीताराम गंगाराम राठोड यांच्यासह सकाळी 10 वाजता ट्रॅक्टरने कामावर गेला. तो शेतात ट्रॅक्टरने टिलरचे काम करीत असतानाच बंधार्‍यावरुन वळण घेत असताना ट्रॅक्टर कलंडले व तरुणाच्या पोटावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच शेतात काम करणारे आई, वडील व काका यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत कैलासचा मृत्यू झाला होता. शासकीय वैद्यकीय महा विद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास सहा.पोलीस निरीक्षक विशाल राठोड करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !