चांदणी रेल्वे स्थानकावरील इमारतीचा दर्शनी भाग कोसळला : वरीष्ठ अनुभाग अभियंत्यांचे निलंबन


पुष्पक एक्स्प्रेसमुळे इमारतीचा दर्शनी भाग कोसळल्याचे वृत्त चुकीचे : रेल्वे प्रशासन

भुसावळ : मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा दर्शनी काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता कोसळला होता. या घटनेमागे ताशी 110 वेगाने धावणारी पुष्पक एक्स्प्रेस गेल्याचे कारण सांगण्यात येत असले तरी रेल्वे प्रशासनाने या बाबीचा इन्कार केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार, घटना बुधवार, 5 रोजी 3.55 वाजता घडली तर पुष्पक एक्स्प्रेस या दिवशी सायंकाळी 5.14 वाजता धावली.

वरीष्ठ अनुभाग अभियंत्यांचे निलंबन
चांदणी रेल्वे स्थानकावरील दोन मजली इमारतीचे 2004 मध्ये निर्माण झाले मात्र अवघ्या सात वर्षात इमारत क्षतीग्रस्त झाल्यामुळे इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत इमारत निर्माण वेळी निर्माण कार्य सुपरव्हिजन करणारे वरिष्ठ अनुभाग अभियंता (कार्य) यांचे निलंबन करण्यात आले आहे. मध्य रेल के महाप्रबंधकांनी मुख्य अभियंता स्तरावरून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीत घटना नेमकी का व कशी घडली? याची चौकशी होवून नेमके घटनेला जवाबदार कोण ? याबाबत जवाबदारी निश्‍चित केली जाणार आहे.



कोसळलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती : सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचा दर्शनी भाग कोसळल्यानंतर तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून बंद पडलेली सिग्नल यंत्रणादेखील कार्यान्वीत करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !