महाराष्ट्राबाहेर राहण्याच्या अटीवर बीएचआर घोटाळ्यातील संशयीत सुरज झंवरला जामीन मंजूर


जळगाव : महाराष्ट्राबाहेर राहण्याच्या अटीवर भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील संशयीत आरोपी सुरज झंवर यास एक लाखांच्या जात मुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीमन मंजूर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेला सहकार्य करण्याचेही आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम. डब्ल्यू सामरे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सूरज झंवरच्या जामिनाच्या निकालावर कामकाज झाले. जामिनातील अटी शर्थींचा भंग केल्यास सूरज झंवरवर कठोर कारवाई होवु शकते, असेही उच्च न्यायालयाने अटी शर्तीनुसार जामीन देताना म्हटले आहे. बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयीत सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलिस कोठडीत आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्यास अटी व शर्तीवर जामीन मंजूर केल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !