हुक्का पार्लरवर कारवाईचा धूर : 22 तरुण-तरुणी ताब्यात


नागपूर : सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना अंबाझरी तसेच सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याने परीमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाल्याने त्यांच्या विशेष पथकाने एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकत 22 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले.

एकाचवेळी दोन ठिकाणी छापे
शुक्रवारी रात्री अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगरातील हवेली कॅफे नामक हुक्का पार्लरमध्ये कॅफे मालक प्रेम जोरणकर आणि प्रीतम यादव त्याचे दोन कर्मचारी आणि सात तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल तसेच येथून रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, पॉट आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला व सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फ्युजन हुक्का पार्लरमधून 11 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले.







तरुणीही हुक्क्याच्या धुरात
या दोन्ही ठिकाणी तरुणांसोबतच तरुणीही मध्य हुक्क्याच्या धुरात झिंगत असल्याचे चित्र पोलिसांना दिसले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मात्र त्या सर्वांची नशा उतरली होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !