पित्यासह मुलाची हत्या : तिघांना अटक


तेल्हारा : तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या भांबेरी पित्यासह मुलाची हत्या करण्यात आली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार भांबेरी येथील देविदास भोजने यांचा गावात आपसी वाद बर्‍याच वर्षापासून सुरू असताना वाद विकोपाला गेल्याने अंदाजे 70 वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा अजय भोजने (30) याला देखील जबर मारहाण करण्यात आल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी सहकार्‍यांनी धाव घेत तीन संशयीत आरोपींना अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !