सावकारी परवाना नूतनीकरणासाठी मागितली लाच : सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे : सावकारी परवाना नूतनीकरणासाठी 20 हजारांची लाच मागून 15 हजारात तडजोड करणार्या सहा.निबंधक सहकारी संस्था कार्यालय, शिरूर, जि.पुणे येथील सहकार अधिकारी शिवाजी महादु गव्हाणे (56) यास पुणे परीक्षेत्रातील एसीबी पथकाने अटक केली. सोमवारी हा सापळा यशस्वी करण्यात आला तर तत्पूर्वी 30 व 31 रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली. आरोपीविरुद्ध शिरूर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती पाटील व सहकार्यांनी यशस्वी केला.





