कौटुंबिक न्यायालयाचा वकीलही अडकला एसीबीच्या जाळ्यात


पुणे : तक्रारदार महिलेचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू असून या खटल्यात नियुक्त वकीलाने तक्रारदार महिलेकडे 10 हजार रुपयांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. आरोपीने सोमवारी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. हरीकिशन श्रीरामजी सोनी (39, कौटुंबिक न्यायालय, शिवाजीनगर, पुणे) असे या वकिलाचे नाव आहे.

लाचखोर वकीलाला अटक
तक्रारदार महिलेचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू असून या खटल्यात नियुक्त वकीलाने तक्रारदार महिलेकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर 27 मे रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली व सोमवारी आरोपीने तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, डिस्ट्रीक्ट लीगल सर्व्हिसेस अ‍ॅथोरीटीकडून कौटुंबिक न्यायालयातील वकीलांना फी अदा केली जाते मात्र असे असतानाही आरोपीने लाच मागितली हे विशेष !







यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे यांनी यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !