सराफाचा खून करीत आठ लाखांचे दागिने लांबवणारा आरोपी जाळ्यात
नाशिक : आठ लाखांचे दागिने घेवून सराफाचा खून करणार्या आरोपीच्या नाशिक गुन्हे शाखा युनीट-1 च्या पथकाने नाशिक रोड भागातील अरिंगळे मळ्यातून मुसक्या बांधल्या. ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (21, रा. शिरुरगाव, जि. बीड) असे अटकतील आरोपीचे नाव आहे. शिरुर कासार येथील सराफ व्यावसायीक विशाल कुलथे यांचा खून करून आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. आरोपीने सराफाकडील 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 4 किलो चांदी असे 8 लाख 37 हजार 800 रुपयांचे दागिन्यांची लूट केल्यानंतर तो नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.