भुसावळात स्वच्छता पखवाड्यानिमित्त पथनाट्यातून जनजागृती


भुसावळात रेल्वेतर्फे स्वच्छता पखवाड्यानिमित्त पथनाट्यातून जनजागृती

भुसावळ- रेल्वेच्या स्वच्छता पखवाड्याचे औचित्य साधून मंगळवारीभुसावळ रेल्वे स्थानकावर स्वच्छ आहारासंदर्भात पथनाट्यातून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेडी डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरीष्ठ मंडळ पर्यावरण व गृह प्रबंधक पी.रामचंद्रन, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ अभियंता (निर्माण) आर.एस.तोमर, सहाय्यक मंडळ यांत्रिक अभियंता शेख जावेद असलम, स्टेशन निदेशक जी.आर.अय्यर, उप स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, वरीष्ठ अनुभाग अभियंता नरोत्तम सिंह, महेंद्र टाक आदी उपस्थित होते. प्रसंगी डीआरएम यांनी रेल्वे स्थानकावरील जनआहार, रसोईगृह, फुड स्टॉलचे निरीक्षण केले.

खाद्यपदार्थांचे घेतले नमूने
डीआरएम यांच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकासह आहार संबंधीत स्टॉल्ससह रेल्वे गाड्यातील पँन्ट्रीकारमध्ये जावून आरोग्य निरीक्षकांसह संबंधित अधिकार्‍यांनी खाद्यपदार्थांची पाहणी करून काही नमूनेही तपासणीसाठी पाठवले. यावेळी रेल्वे प्रवाशांशी संवादही साधण्यात आला. वरीष्ठ प्रशिक्षक भारत चौधरी व प्रशिक्षकांतर्फे मुख्य यार्ड प्रबंधक कार्यालय परीसरात 200 झाडे लावण्यात आली.


कॉपी करू नका.