ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील व निलेश वाणी यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार जाहीर
भुसावळ : देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. त्यात प्रिंट मीडिया श्रेणीत संजय प्रभाकर देशमुख (जालना), इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत जगदीश एकनाथ जयस्वाल (शहादा), ऑनलाईन न्यूज पोर्टल श्रेणीत शेखर पाटील (जळगांव) व सोशल मीडिया मुक्त लेखन म्हणून निलेश सुभाष वाणी (भुसावळ) यांचा समावेश आहे.
ऑनलाईन पुरस्काराचे वितरण
रविवार, 6 जून रोजी सायंकाळी सात वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या ऑनलाईन सोहळ्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून इंडियन कॉउन्सिल फॉर कल्चरल रीलेशन्सचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य डॉ.विनयजी सहस्रबुद्धे उपस्थित असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या उपाध्यक्षा डॉ.केजल भारसाखळे असतील. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यु-ट्यूब चॅनलवर करण्यात येणार असल्याचे देवगिरी विश्व संवाद केंद्राचे संयोजक ओंकार रत्नाकर शेलदरकर कळवतात.


