सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणारे दोघे जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


जळगाव : सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्‍या दोघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. राहुल रामचंद्र बर्‍हाटे (27, रा. रामेश्वर कॉलनी) व गोलु उर्फ दत्तु नारायण चौधरी (26, रा.तुकाराम वाडी जळगाव) अशी हद्दपार आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोघांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी यांनी पाठपुरावा केला.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !