अज्ञात वाहनाच्या धडकेत आंबे विक्रेता ठार


जळगाव : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावातील आंबे विक्रेता जागीच ठार झाला तर दुचाकीवर सोबत असलेला अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात बांभोरी बसस्थानकासमोर रविवारी रात्री आठ वाजता झाला. शाहिद शकिल बागवान (22, रा. टिपू सुलतान नगर, तांबापूरा, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद
आंबे विक्री करून कुटुंबाचा रहाटगाडा चालवणारा शाहिद शकिल बागवान व रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने पाळधी येथे वसुलीसाठी निघाला असता बांभोरी गावाजवळील बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शाहिद बागवान हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र हा जखमी झाला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.







 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !