राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचा डंका : काजल मलखान सिंह राज्यात द्वितीय


भुसावळ : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळामार्फत राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलची विद्यार्थिनी काजल मलखान सिंह हिने राज्यस्तरावर तीन हजार स्पर्धकातून द्वितीय क्रमांक पटकावला. काजल सिंहने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, संचालक रौनक बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील, कला शिक्षक जे.आर.सोनार तसेच शिक्षक वृंदांनी गौरव करून कौतुक केले. यावेळी काजलचे पालक मलखान सिंह व आई उर्मिला सिंह उपस्थित होत्या. काजलला स्पर्धेसाठी शाळेचे कलाशिक्षक जे.आर.सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !