सॅनिटायझर बनविणार्या कंपनीला भीषण आग : महिला कामगारांसह 18 जणांचा होरपळून मृत्यू
पुणे : पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजीस या सॅनिटायझर बनविणार्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर 16 महिला कामगारांसह 18 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी सोडतीन वाजता घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आली.
केमिकलमुळे भडकली आग
सॅनिटायझरसह अन्य केमिकलही बनविली जात असल्याने या कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकल्याचे सांगण्यात आले. या कंपनीत सुमारे 45 कामगार असून बहुतांश महिला होत्या. आग लागली त्या वेळी 37 कर्मचारी आतमध्ये होते. महिलांना बाहेर पडणे शक्य न झाल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनाग्रस्त एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निकुंज शहा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.






आगीत यांचा झाला मृत्यू
अर्चना कवडे, संगीता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार, सचिन घोडके यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.