पाचशे रुपयांची लाच भोवली : पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
नागपूर : रुग्णवाहिकेची रीक्षा धडक लागल्यानंतर ऑटोचे नुकसान झाले मात्र पाचशे रुपयांची लाच न दिल्यास ऑटो चेंबरला लावण्यासह दोन हजारांची दंडाची कारवाईची धमकी देणारा पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात अडकला. आरोपीने लाच स्वीकारली नसली तरी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. बिपीन शंकरराव महाजन (32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
आरोपी महाजन 500 रुपयांच्या लाचेसाठी कारवाईची धमकी देत असल्याने ऑटो चालकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली मात्र महाजनला सापळा आल्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. मंगळवारी दुपारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.





