रेखा जरे हत्याकांड : सात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल


अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठेसह एकूण सात आरोपींविरोधात मंगळवारी पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बोठे याच्याविरोधात कट रचून खून करणे तर उर्वरित सहा आरोपींविरोधात फरार आरोपींना मदत करणे या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आला आहे. बाळ बोठे, जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !