रावेर तालुक्यात वीज कोसळून दहा जण जखमी
रावेर : तालुक्यातील जिन्सी या आदिवासी भागात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडामध्ये हलका स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. याचवेळी वीज कोसळल्याने बैलगाडीवर बसलेले दहा जण किरकोळ जखमी झाले. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत बळीराम दल्लू पवार (21), दिलीप लक्ष्मन पवार (21), अरविंद साईराम पवार (15), ईश्वर दल्लू पवार (15), कमलसिंग लक्ष्मण पवार (20), अनिल लक्ष्मण पवार (27), बिंदुबाई लक्ष्मण पवार (50),
साईराम मोरसिंग पवार (37), मलखान मोरसिंग पवार (45), लक्ष्मण मोरसिंग पवार (55) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना मिळताच त्यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन किरकोळ जखमीची विचारपूस केली. गंभीर दुखापत नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी सांगितले आहे.




