पिंप्रीसेकमला 73 हजारांची गावठी दारू नष्ट
भुसावळ : तालुका पोलिसांनी पिंप्रीसेकम शिवारातील नाल्याजवळ सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकत 73 हजार 400 रुपये किंमतीचे एक हजार 800 लीटर रसायन नष्ट केले तसेच 60 लीटर गावठी दारू जप्त केली. अशोक धनसिंग तायडे यांच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, श्याम कुमार मोरे, विठ्ठल भुसे, प्रेमचंद सपकाळे, जितेंद्र साळुंखे, होमगार्ड निलेश सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.



