लग्नाच्या आमिषाने फसवणूक : पाच आरोपींविरुद्ध गुन्हा


वरणगाव : मुलाचे लग्न जमवुन देतो या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी वरणगाव पोलिसात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भगवान सीताराम सुरडकर (74, रा.अंबाई, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) यांना भुसावळ येथील सुरभी हॉटेलमध्ये 20 ऑक्टोबर 2020 रोजी तुमचा मुलगा गणेश याचे लग्न जुळवण्यासाठी आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगून संशयीतांनी त्याच दिवशी वीस हजार व इतर दोन वेळा मिळून एकूण एक लाख 15 हजारांची रक्कम उकळली मात्र मुलाचे लग्न न जमवल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संशयीतांविरोधात तक्रार देण्यात आली. संशयीत आरोपी रमेश सांडू शिंबरे (रेलगांव, ता.सिल्लोड), अशोक तायडे, संजय अशोक कुलकर्णी (तोतया, खिर्डी), छाया दर्याव मीना (जळगाव), ज्योती अशोक कुलकर्णी (वरणगाव फॅक्टरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कुमारबोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेंद्र तायडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !