वीजपुरवठ्यात बिघाड : भुसावळात उत्तर भागात वीजपुरवठा ठप्प


भुसावळ : खेडी 132 उपकेंद्रावरून तापी नगर केंद्राला वीज जोडणी करणार्‍या अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने भुसावळातील उत्तर भागातील वीजपुरवठा बुधवारी सकाळी 11.30 वाजेपासून ठप्प झाल्यानंतर तो रात्री नऊ वाजेनंतरही सुरळीत न झाल्याने नागरीकांसह व्यापारीवर्गाचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत साकेगाववरून वीज जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमन स्टॉप घटनास्थळी थांबून आहेत.

अर्धे शहर अंधारात
अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने अर्धे भुसावळ शहर अंधारात बुडाले. रेल्वे रूळाकडील उत्तरेकडचा संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरीकांकडून सातत्याने वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल? याबाबत विचारणा केली जात आहे. जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज रोड तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या परीसरात वीज गुल झाल्याने व्यापारीवर्गासह नागरीकांचे चांगलेच हाल झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !