भुसावळात लसीकरण केंद्राचे उद्घाटन


भुसावळ : शहरातील द.शि. विद्यालयात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते लसीकरण केंद्राचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या केंद्रात दररोज 2 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि द. शि. विद्यालय केंद्र मिळून तीन हजार नागरीकांचे लसीकरण होणार आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे. प्रसंगी आमदार संजय सावकारे, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, आरोग्य सभापती दिनेश राठी हे उपस्थित होते.

लसीकरणामुळे कोरोनावर मात : आमदार
यावेळी आमदार संजय सावकारे यांनी सर्व नागरीकांनी लसीकरण केल्यास तिसर्‍या लाटेतील लहान मुलांमधील आजाराचे प्रमाण आपण निश्चित कमी करू शकतो, असे स्पष्ट केले आणि शहरातील नागरीकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले. नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, 18 ते 44 या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण या ठिकाणी होणार असून या करीता अद्ययावत, असा संगणक कक्ष तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून आलेल्या नागरीकांची त्वरीत नोंदणी करून लसीकरण करण्यात येईल, अशी माहीती दिली. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ. संदिप जैन, डॉ.तौसीफ खान, डॉ.आतिया खान, डॉ.अर्शिया शेख, डॉ.उज्वला भंगाळे, डॉ.अश्विनी वर्मा, औषध निर्माता प्रकाश तळेले व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !