भुसावळात शिक्षकाचे घर फोडले : लाखोंचा ऐवज लंपास


भुसावळ : शहरातील बी.झेड.हायस्कूलमधील शिक्षकाच्या बंद घरातून चोरट्यांनी लाखोंचा ऐवजावर डल्ला मारल्याची घटना बुधवार, 23 रोजी सकाळी उघडकीस आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

घर बंद असल्याची चोरट्यांनी साधली संधी
खडका रोड वरील रॉकेल डेपोजवळील रहिवासी व शिक्षक शेख अल्ताफ शेख हुसेन हे कुटुंबासह घराला कुलूप लावून यावलला गेल्याने चोरट्यांनी संधी साधत घरातील कपाटातून शिक्षक शेख अल्ताफ शेख हुसेन यांचा तीन महिन्याचा 70 हजार रुपये पगार, घर बांधकामासाठी काढलेले दिड लाख, पोत, अंगठी, पाच तोळे वजनाचा गोफसह लाखोंचा ऐवज लांबवला. बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी पाहणी केली. या प्रकरणी पोलिसात अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !