जळगावात वर्गणी मागण्यावरून वाद विकोपाला : एकास मारहाण


जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्यावरून वाद वाढवल्याने तिघा संशयीत आरोपींनी बेदम मारहाण केल्याने संदीप सुरेश पाटील हा चहा विक्रेता जखमी झाला तर त्याच्या डोक्यात बियरची बाटली मारण्यात आली. या घटनेमुळे इच्छादेवी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले व सोन्या शिरसाठ यास ताब्यात घेतले तर भल्या तडवी व चेतन परदेशी दोघं जण फरार झाले आहेत. या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावती फाडण्यावरून वाद विकोपाला
राहुल व संदीप पाटील या भावंडांची इच्छा देवी चौकात चहाची टपरी असून संशयीत आरोपी सोन्या शिरसाठ, भल्या तडवी व चेतन परदेशी यांनी देवीची पावती फाडण्यासाठी राहुलकडे पैशांची मागण केली तर 500 रुपये दिल्यानंतरही आरोपींचे समाधान न झाल्याने या तिघांनी तीन हजार रुपये मागितले, ते देण्यास नकार दिला असता तिघांनी राहुल याला मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संदीप याच्या डोक्यात एकाने बियरची बाटली मारली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, सचिन चौधरी व अतुल पाटील यांनी घटनास्थळ गाठून परीस्थितीवर नियंत्रण मिळविले.


कॉपी करू नका.