पाल विश्रामगृहात महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अधिकार्यांची बॉर्डर मिटींग
रावेर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील पोलिस अधिकार्यांची डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालच्या शासकीय विश्रामगृहावर बॉर्डर मिटिंग गुरुवारी रात्री घेण्यात आली. दोन्ही राज्यातील पैशांसह दारू, शस्त्र आदी बाबींची तस्करी होणार नाही या संदर्भात चर्चा करून वाहनांची कडक तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले शिवाय गुन्हेगारदेखील प्रांतांमध्ये वावरता कामा नये या संदर्भातही चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे व सहकार्य करण्याचे आश्वासन या बॉर्डर मिटींगमध्ये देण्यात आले. या बैठकीला रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, भगवानपूरा पोलिस निरीक्षक चौहान, उपनिरीक्षक बामनिया, लालबागचे सिंध्या निंबोला, शिरवेल चौकीचे मोरे, भगवानपुराचे एएसआय सुरेश शर्मा आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.