मालवाहू रीक्षावर आयशर धडकल्याने दोघे जखमी


बांभोरीजवळ अपघात : अपघातानंतर आयशर चालक पसार

जळगाव : भरधाव कालीपीलीने मालवाहू रीक्षाला धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना बांभोजीजवळ शुक्रवारी घडली. अपघातानंतर कालिपीलीचालक पसार झाला. दरम्यान, 108 रुग्णवाहिका वेळीच धावून आल्याने जखमींना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. रवीशंकर प्रजापत (30) व राजेंद्र किशोर धुप्पड (35, दोघे रा.खेडी खुर्द) अशी जखमींची नावे आहेत.

अपघातानंतर आयशर चालक पसार
जळगाव- भुसावळ रस्त्यावरील लोढा नगरातील प्रेम बेकरी असून दोघे जखमी तेथे कामाला आहेत. माल पोहचविण्यासाठी दोघे बेकरीच्या मालवाहू पॅजो (एम.एच 19 एस.9034) ने धरणगाव येथे गेले व परतीच्या प्रवासात बांभोरीजवळ धरणगावकडे पाईप घेवून जात असलेल्या आयशर (एम.एच.04 सी.यु.0617) ने पॅजोला धडक दिली. जोरदार धडकेमुळे पॅजोतील चालक रविशंकर प्रजापत व राजेंद्र धुप्पड हे दोघे वाहनातून बाहेर फेकले जावून रस्त्यावर पडले.


कॉपी करू नका.