देवेंद्र फडणवीस हे तर खोटे बोलणारे मुख्यमंत्री : काँग्रेस नेते नाना पटोलेंची टिका


मुंबई : देवेंद्र फडणवीस हे तर खोटारडे मुख्यमंत्री असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परीषदेत नाना पटोले यांना एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गायब झाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे तसेच भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी, ओबीसी विरोधी पक्ष असल्याचा दावा करत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !